50 years of OPAL - Hotel Opal Kolhapur Specialty Kolhapuri Veg and Non veg Cuisine

Go to content

Main menu:


Evolution of OPAL's logo.

करवीरनिवासिनी आई अंबाबाई देवी आणि टेंबलाई देवी यांच्या कृपेने नोव्हेंबर 1968 पासून आजपर्यंतची 'हाॅटेल ओपल' ची यशस्वी वाटचाल समृद्ध झाली ती आमच्या असंख्य ग्राहकांची आपुलकी, हितचिंतकांची सदिच्छा, ज्येष्ठांचे मार्गदर्शन व सहकार्यांची अनमोल साथ यामुळेच. पन्नासाव्या वर्षात पदार्पण करत असताना आम्ही यासर्वांप्रती मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो.

आपले विनम्र,
हाॅटेल ओपलचे संचालक, व्यवस्थापन व कर्मचारी वर्ग.


पन्नास वर्षांपूर्वीची गोष्ट. कोल्हापूर तेव्हा बदलाच्या एका नव्या टप्प्यावर होतं. स्वातंत्र्य स्वीकारूनदेखील राजेशाहीचा डाम-डौल जपत होतं. सोबत होती आपुलकी, पिढ्यानपिढ्या मनामनात रुजलेली. तो काळ स्थानिक उद्योग आणि कारखानदारी यांच्यासाठी भरभराटीचा होता. देशभरातील, जगभरातील व्यावसायिकांचं कोल्हापुरात येणं-जाणं सुरु झालं होतं. सोबतीला श्री महालक्ष्मीला, जोतिबाला येणाऱ्या भक्तांची संख्या देखील खूप होती. एकंदरच कोल्हापूरचं पर्यटन रुजण्याची ती सुरुवात होती.

वाढत्या पर्यटनाची गरज ओळखून कै. बापूसाहेब घाटे, कै. मोहनराव लाटकर आणि कै.  शामराव प्रभावळकर यांनी सन १९६८ साली तत्कालीन पुणे-बेंगलोर महामार्गावर असलेल्या महागावकर सरकारांच्या टुमदार बंगल्यात हॉटेल ओपल ची सुरुवात केली. अस्सल कोल्हापुरी मांसाहारी आणि शाकाहारी जेवण देणारं, सर्व सुविधांची परिपूर्ण असं बहुदा पंचक्रोशीतील हे एकमेवच ठिकाण असावं.

आपुलकीनं आणि प्रेमानं होत असलेला पाहुणचार, स्वच्छता, नीटनेटकेपणा, टापटीप, कोल्हापुरी खाद्य परंपरेला शोभेल असे सुग्रास जेवण या सगळ्या गुणांमुळंच 'ओपल' चा नावलौकिक अल्पावधीतच सर्वदूर पसरला.

कै. दिगंबर कामत, श्री. बाळ मोघे, श्री. शांताराम सुर्वे, श्री. रवळनाथ कामत आदी सहकाऱ्यानी कुटुंब वत्सलतेने 'ओपल'चे व्यवस्थापन केले आहे. 'ओपल'च्या प्रगतीचा आणि यशाचा गाभा या सर्वानी सातत्याने जपला आहे.

पन्नास वर्षांपूर्वी केलेली एक छोटीशी सुरुवात आज बहरली आहे. कोल्हापूरच्या अस्सल खाद्य संस्कृतीची ओळख सगळ्या जगाला करून देत आहे. आज 'ओपल'चे व्यवस्थापन नव्या पिढीकडे आले आहे. श्रीधर घाटे, संजय प्रभावळकर, सिद्धार्थ लाटकर व श्रेयस घाटे यांच्या कुशल देखेरेखी खाली कालानुरूप 'ओपल'ने अनेक आंतरबाह्य बदल स्वीकारले. काळाची गरज म्हणून, पर्यटकांची / पाहुण्यांची मागणी म्हणून केलेल्या या बदलांसह 'ओपल'  आपल्या वाटचालीतील एक संस्मरणीय टप्पा गाठतंय. आपलं 'ओपल' चक्क ५० वर्षांचं होतंय. पन्नाशी गाठतानाच नवीन आकर्षक अंतर्गत सजावटीने सजलेलं 'ओपल' आज २३ प्रशस्त एसी, नॉन एसी रूम्स, संपूर्ण वातानुकूलित डायनिंग हॉल सह २२० पाहुण्यांना एकाच वेळी सेवा देण्यासाठी सज्ज आहे. पाहुण्यांच्या गाड्यांसाठी दुमजली  पार्किंग, बच्चे कंपनीसाठी खेळणी, परगावच्या पाहुण्यांसाठी कोल्हापूरचे खाद्यपदार्थ, योग्य पर्यटन मार्गदर्शन सेवा या आणि अशा अनेक आवश्यक सुविधांची इथं रेलचेल पाहायला मिळते. आणि सोबतच मिळते अगत्याने, आदरातिथ्याने भरलेली 'आपुलकी'... कोल्हापूच्या मातीत उगवणारी, रुजणारी आणि बहरणारी. Hospitality with simplicity हे ब्रीद सार्थ ठरवणारी.

 
Copyright 2016. All rights reserved.
Back to content | Back to main menu